Marathi Birthday wishes-Birthday Wishes in Marathi | 50+ वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये -marathi happy birthday wishes -2022

Marathi Birthday wishes ~खरं तर, वाढदिवस म्हणजे तुमच्या अस्तित्वाची सुरुवात आणि जगण्यातला आनंद ठळक करणारा दिवस. वाढदिवसाचा प्रत्येक संदेश म्हणजे नात्याची नात्याची सुरुवात. भागीदारीत, प्रेमाचे दोन प्रकार असतात. तुमच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजकाल सोशल मीडियावर प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे फॅशनेबल झाले आहे. सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या आनंदवस्तू मराठीत मिळाल्यास त्यांना अधिक महत्त्व आहे. तुमच्यासाठी निवडण्यासाठी आम्ही 50+ हून अधिक मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छांची यादी तयार केली आहे.

Marathi Birthday wishes

————————————-

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

————————————-

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

——————————————

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

————————————-

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

————————————-

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

————————————-

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!

————————————-

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

————————————-

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

————————————-

Marathi Birthday wishes

————————————-

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

————————————-

हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे.

————————————-

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

————————————-

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई !

————————————-

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!

————————————-

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास.
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला.
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

————————————-

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

————————————-

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

————————————-

Marathi Birthday wishes

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

————————————-

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

————————————-

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना.

————————————-

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

————————————-

Birthday Wishes in Marathi

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

————————————-

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा!

————————————-

झेप अशी घ्या की पाहणायांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

————————————-

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

————————————-

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

————————————-

Marathi Birthday wishes~वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

————————————-

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

————————————-

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

————————————-

Marathi Birthday wishes

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

————————————-

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
a
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

————————————-

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

————————————-

v

Leave a Comment